BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : प्रा. तुकाराम पाटील यांना गझलसम्राट सुरेश भट पुरस्कार जाहीर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – शब्दधन काव्यमंच साहित्य संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी कवींना काव्यपुरस्कार दिले जातात. शहरात अनेक गझलकार आहेत त्यांच्या गझल प्रतिभेला प्रेरणा मिळावी म्हणून यावर्षीपासून गझल लिहिणाऱ्या कवींना पुरस्कार देण्यात येणार आहे. यंदाचा पहिला गझलसम्राट सुरेश भट पुरस्कार प्रा. तुकाराम पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे.

प्रा. तुकाराम पाटील यांनी गझल क्षेत्रात दिलेल्या योगदानांबद्दल देण्यात येणार आहे. “अरविंद भुजबळ स्मृती पुरस्कार” कवी निशिकांत गुमास्ते यांना तर “छावा काव्य पुरस्कार” कवी देवेंद्र गावंडे, आत्माराम हारे, कवयित्री समृद्धी सुर्वे आणि पंढरपूर येथील कवी सोमनाथ टकले यांना लवकरच देण्यात येतील.

  • ‘शब्दधन’ काव्यमंच गेल्या 20 वर्षापासून कवींना प्रेरणा मिळावी म्हणून हा उपक्रम घेत आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक आणि उपाध्यक्ष सुभाष चव्हाण आणि सचिव माधुरी विधाटे यांनी दिली.
HB_POST_END_FTR-A2

.