Pimpri : उद्योगनगरीतही बारावीच्या परीक्षेत मुलीच सरस

बारावीच्या निकालात मुलींची टक्केवारी मुलांच्याही पुढे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राच्या राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ८९.०९ टक्के लागला. त्यामध्येही मुलींनीच बाजी मारली आहे. बारावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यामध्ये सकाळपासून निकालाची उत्सुकता दिसून येत होती. काही जणांनी आपल्या स्मार्टफोनवर निकाल पाहण्यास पसंती दिली.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या बारावीच्या परीक्षेसाठी एकूण १७ हजार ४९१ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरला होता. पिंपरी-चिंचवड शहरातील मुलींचा निकाल ९३.०१ टक्के तर मुलांचा निकाल ८५.८४ टक्के लागला. एकंदर शहराचा ८९.०९ टक्के निकाल लागला आहे.

_MPC_DIR_MPU_II
 • शंभर टक्के लागलेली महाविद्यालये :
  जयहिंद हायस्कूल पिंपरी, पोदार इंटरनॅसनल स्कूल, द न्यू मिलेनियम स्कूल सांगवी, एस.एफ. जैन विद्यालय ज्यु. कॉ.चिंचवड, श्री स्वामी समर्थ ज्यु. कॉलेज भोसरी, के.जे. गुप्ता ज्यु. कॉलेज चिंचवड, मॉडर्न हायस्कूल ज्यु. कॉलेज निगडी, रामचंद्र गायकवाड विद्यालय दिघी, डॉ. डी. वाय, पाटील एज्युकेशन कॉलेज चिंचवड, निर्मल बेंथनी हायस्कूल काळेवाडी, शिवभूमी विद्यालय यमुनानगर निगडी, अमृता ज्यु.कॉलेज निगडी, एस.एन. बी. पी. ज्यु. कॉलेज मोरवाडी, सेंट उर्सुला स्कूल आकुर्डी, संचेती ज्यु.कॉलेज चिंचवड,, होरायझन इंग्लिश मिडियम स्कूल दिघी, सरस्वती विश्व विद्यालय, पी. बी. जोग विद्य़ालय चिंचवड, अभिषेक आर्टस, कॉमर्स ज्यु. कॉलेज चिंचवड, सिटी प्राईड ज्यु. कॉलेज प्राधिकरण निगडी, लिटिल फ्लॉवर्स ज्यु. कॉलेज जुनी सांगवी, क्रिएटिव्ह पब्लिक स्कूल ज्यु. कॉलेज आकुर्डी, एस.एन.बी. पी. कॉलेज रहाटणी, सुरेश मोरे उच्च माध्यमिक विद्यालय,एस.एन. बी. पी.ज्यु. कॉलेज चिखली.

१ हजार ९०६ विद्यार्थ्यांना करणार ऑक्टोबर वारी:
शिक्षण मंडळाकडून नापास विद्यार्थ्यांसाठी पुढील सत्रात परीक्षा घेण्यात येते. दरम्यान मागील काही वर्षांपासून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी निकालानंतर दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत परीक्षा घेण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना सहा महिने वाट पहावी लागत नाही. त्याच धर्तीवर यावर्षी देखील दोन ते तीन महिन्यांत परीक्षा घेतल्यास अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचे वाया जाणारे एक शैक्षणिक वर्ष वाचणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात बारावीच्या परीक्षेत १ हजार ९०६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

 • पिंपरी-चिंचवड शहराच्या बारावीच्या निकालासंबंधी प्रमुख आकडेवारी:
  # शहरात एकूण १७ हजार ४९१ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरला. त्यामध्ये ९ हजार ५६० विद्यार्थी तर ७ हजार ९३१ विद्यार्थिनी होत्या.
  # १७ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यात ९ हजार ५४६ मुले तर ७ हजार ९२८ मुली होत्या,
  # परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ५६८ विद्यार्थ्यांना यश मिळाले. त्यामध्ये ८ हजार १९४ मुले आणि ७ हजार ३७५ मुली आहेत.
  # राज्यांसह पिंपरी-चिंचवड शहरात देखील मुली मुलांपेक्षा सरस ठरल्या. पिंपरी-चिंचवड शहरातील मुलींचा निकाल ९३.०१ टक्के तर मुलांचा निकाल ८५.८४ टक्के लागला. एकंदर शहराचा ८९.०९ टक्के निकाल लागला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.