Pimpri : धनुर्विद्या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील ‘स्टार आर्चस अकॅडमी’च्या मुलींना सुवर्ण पदक

एमपीसी न्यूज – जीसीएम स्कूल संगरूर पंजाब येथे झालेल्या दिनांक 9 ते 14 नोव्हेंबर दरम्यान सीबीएसई राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत पिंपरी चिंचवडमधील स्टार आर्चस अकॅडमीच्या मुलींनी उत्कृष्ट कामगीरी करून 14 वर्षीय कंपाऊंड राऊंड गटात सांघिक सुवर्ण पदक मिळवले. संघामध्ये तन्वी बुंदेले, अस्मी तंडण, जुईली राऊत या तिघींचा समावेश होता. या तिघीं पिंपरी चिंचवडमधील स्टार आर्चस अकॅडमीमध्ये सराव करतात.

तसेच १७ वर्ष रिकव्हरी राऊंड सांघिक प्रकारात यशस्वी भारद्वाज,पार्थ आपटे ,अधिराज गाडगे यांचा समावेश असून चांगला खेळ दाखवत मुलांचा संघ आठव्या स्थानावर राहिला. हि सर्व मुले ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल शाळेत असून पिंपरी चिंचवड मधील स्टार आर्चस अकॅडमीमध्ये सराव करतात.

पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष सुभाष मंत्री तसेच शाळेच्या मुखाध्यापीका अमृता वोरा आणि पिंपरी चिंचवड धनुर्विद्या संघटनेच्या सचिव व स्टार आर्चस अकॅडमीच्या संचालिका सोनल बुंदेले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.