Pimpri : प्रवीण काकडेंना विधानपरिषदेवर संधी द्या- बंडू मारकड  

Give a chance to Praveen Kakade on the Legislative Council- Bandu Markad

एमपीसी न्यूज – ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून संधी देण्याची मागणी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बंडू मारकड पाटील यांनी केली आहे.

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ (दिल्ली) महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी बंडू मारकड पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी आयोजित बैठकीत मारकड यांनी ही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी महासंघाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी बंडू मारकड पाटील यांना नियुक्तीपत्र दिले.

मारकड यांनी सांगितले, की काकडे यांनी संघटनेच्या माध्यमातून तळागाळातील गरजूंना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे काम केले आहे.

त्यामुळे राज्यपाल नियुक्त कोट्यातून प्रवीण काकडे यांची आमदारपदी निवड करण्यात यावी. मारकड यांची पिंपरी-चिंचवड शहरातील संघटनेला दिलेले योगदान पाहून प्रवीण काकडे यांनी मारकड यांच्यावर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.

याप्रसंगी मराठावाडा अध्यक्षपदी सुनिल बनसोडे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष संजय खताळ, माध्यम प्रवक्ते म्हणून महावीर काळे, पुणे जिल्हाध्यक्ष हिरकांत गाडेकर, पिंपरी-चिचवड अध्यक्ष दीपक भोजने, युवक अध्यक्ष संतोष पांढरे, महासचिव संजय नायकुडे, पुणे जिल्हा युवती आघाडी अध्यक्षा यशोदा नायकुडे, उस्मानाबाद जिल्हा युवक अध्यक्ष युवराज हराळ यांची नियुक्ती करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.