-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri: जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न द्या; महासभेत ठराव

Give Bharat Ratna to senior industrialist Ratan Tata; General Assembly Resolution

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

कोरोनाच्या लढाईत मोलाची मदत

एमपीसी न्यूज – टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत मोठी मदत केली आहे. टाटा उद्योग समूहाच्या वतीने तब्बल 1 हजार 500 कोटींची मदत केली आहे. देशावर ज्यावेळी संकट आले त्यावेळी ते मदतीसाठी सरसावले आहेत. पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत व नावलौकिकात भर टाकणारा टाटा मोटर्स हा  मोठा उद्योग समूह आहे. त्यामुळे रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे,  असा ठराव पालिका महासभेत पारित केला आहे.  तसेच याबाबत  राज्य, केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची तहकूब सभा सोमवारी (दि.1) पार पडली. या सभेत ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा ठराव उपसूचनेद्वारे करण्यात आला. या उपसूचनेला एकमताने मान्यता देण्यात आली.

टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईत मदतीचा हात पुढे  केला आहे. त्यासाठी टाटा उद्योग समूहाच्या वतीने तब्बल 1 हजार 500 कोटींची मदत केली आहे. शिवाय मुंबई येथील हॉटेल ताज विनामोबदला कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये काम करणा-या वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांना राहण्यासाठी उपलब्ध करुन दिले.

शिवाय त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी भरीव अशी मदत केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी देशावर ज्या-ज्या वेळी संकटे आली  त्या त्या  वेळेस त्यांनी सर्वतोपरी मदत केली आहे.

टाटा उद्योग समूह हा पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत व नावलौकिकात भर टाकणारा मोठा उद्योग समूह आहे. टाटा उद्योग समूहाच्या माध्यमातून शहरातील अनेक तरुणांना उद्योग व्यावसाय, नोक-या उपलब्ध करुन देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

यामुळे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांना सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे असा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. राज्य, केंद्र सरकारकडे त्याची शिफारस केली. तुषार हिंगे यांनी मांडलेल्या उपसूचनेला केशव घोळवे यांनी अनुमोदन दिले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.