Pimpri : युती झाल्यास मावळमधून जिंकणा-यालाच उमेदवारी द्या; आमदार भाऊंची गुगली

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती झाली तर चांगलेच आहे. जागा वाटपात भाजपने मावळ मतदारसंघातून आपणाला उमेदवारी दिली, तर निश्चितपणे निवडणूक लढविणार आहे. मावळ मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला, तर निवडणुकीत जिंकून येणा-याला उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी करत भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी शिवसेनेला गुगली टाकला आहे. तसेच निवडून येणारा उमेदवार न दिल्यास अन्‌ पराभव झाल्याल त्याला आम्हाला जबाबदार धरु नये, असेही ते म्हणाले.

मोरवाडीत आज (शुक्रवारी)झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आमदार जगताप पुढे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा विजय होईल. एवढी ताकद पक्षाची निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यास दोन्ही पक्षांसाठी फलदायी ठरणार आहे. युतीच्या जागा वाटपात मावळ मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आणि पक्षाने आपणाला उमेदवारी दिली. तर, आपण शंभर टक्के निवडणूक लढविणार आहे.

मात्र,  मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला. तर, त्या पक्षाने निवडणुकीत जिंकणारा उमेदवार द्यावा, अशी मागणी करत जगताप यांनी गुगली टाकला. तसेच ज्यांना बुथप्रमुख सुद्धा नेमण्यासाठी कार्यकर्ते मिळत नाहीत.  अशांना उमेदवारी देऊन शिवसेनेने आपला पराभव पत्कारू नये. त्यानंतर  शिवसेनेने आम्हाला जबाबदार धरू नये, असेही जगताप म्हणाले.

भाजपचे नगरसेवक पक्षाच्या विरोधात बोलत असल्याबाबत विचारले असता जगताप म्हणाले, भाजपची पहिल्यांदाच सत्ता आली आहे. जे निवडून येऊ शकत नव्हते, ते भाजपच्या तिकीटावर निवडून येऊन नगरसेवक झाले आहेत. काही मोजके नगरसेवक पक्षविरोधी भूमिका मांडत असल्याचे निदर्शनास आले आहे. पक्षनेते तसेच प्रमुख पदाधिका-यांशी त्याबाबत आमची चर्चा झाली आहे. यापुढे कोणत्याही नगरसेवकाला पक्षाच्या भूमिकेबाबत काही अडचण असल्यास त्यांनी येऊन आमच्याशी सविस्तर चर्चा करावी. थेट पक्षाविरोधात कोणी बोलले अन्यथा भूमिका घेतली. तर, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.