Pimpri : खासगी डॉक्टरांना विमा कवच द्या; फँमिली फिजिशियन असोशियनची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना बाधित खासगी डॉक्टाराचे नाव,पत्ता व त्यांच्या व्यवसायाचे ठिकाण प्रसिद्ध करण्यात येऊ नये. कोरोना बाधित खासगी डॉक्टरांना रुग्णालयात राखीव जागा ठेवाव्यात. खासगी डॉक्टरांना कुठल्याही प्रकारचे विमा संरक्षण नाही. त्यांना विमा संरक्षण पुरविण्यात यावे, अशा विविध मागण्या खासगी डॉक्टरांच्या फँमिली फिजिशियन असोशियन या संस्थेच्या डॉक्टरांनी महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी डॉक्टरांनी शासनाच्या आव्हानास प्रतिसाद देत, त्यांचे दवाखाने चालू केले आहेत. परंतु त्यांना व्यवसाय करताना काही अडचणी येते आहेत. त्यावर खासगी डॉक्टरांच्या फँमिली फिजिशियन असोशियन या संस्थेच्या डॉक्टरांनी आज (सोमवारी) विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्यासह आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन डॉक्टरांच्या अडचणी विषयी चर्चा केली.

काही खासगी डॉक्टरांना कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये कॉरटाईन केले जाते, तसे न करता त्यांना घरीच कॉरटाईन करण्यात यावे. कोरोनाची लक्षणे आढळलेल्या रुग्णास पुढील उपचार अथवा तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात जाण्याबाबत सल्ला दिला असता बहुतेक रुग्ण जात नाही.

अशा रुग्णांची माहिती महापालिका प्रशासनास दिल्यास संबंधित रुग्णांचे नातेवाईक त्या खासगी डॉक्टारास शिवीगाळ करतात. अशा गोष्टी गोपनिय ठेवल्या जाव्यात. तसेच डॉक्टरांसाठी अत्यावश्यक असणारे पीपीई किट, एन 95 मास्क, सँनिटायझर या गोष्टी सतत वापराव्या लागतात. त्या रास्त दरात मिळाव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.