BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : शहरातील अल्पसंख्याकांना न्याय द्या; पिंपरी विधानसभा युवासेनेची राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे मागणी

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील अल्पसंख्याकांना न्याय मिळावा, अशी मागणी युवासेना पिंपरी विधानसभा यांनी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी आरफत शेख यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, अल्पसंख्याक युवकांना रोजगार सुरु करण्यासाठी शासकीय योजनेनुसार कर्ज मिळावे यासाठी व व्यवसाय कर्ज मिळण्यासाठी बॅंकाना आदेश देण्यात यावे, कारण बॅंकाकडून विनाकारण कठीण अटी लागू करुन युवकांचे कर्ज प्रकरण फेटाळण्यात येत आहे. तरी आपण योग्य ती दखल घेऊन पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी केली.

  • यावेळी पिंपरी विधानसभा युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, युवानेते सागर लांगे, उपविभाग संघटक सनी कड, युवासेना शाखाधिकारी ओंकार जगदाळे, राहुल राठोड, अजय पिल्ले आदी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A1
.