Pimpri : “ पुणेरी पगडी ”ऐवजी “फुले पगडी ”द्या !

युवक काँग्रेसची मागणी 

एमपीसी न्यूज – “ पुणेरी पगडी ” ऐवजी  “फुले पगडी ” देऊन नवीन पदवी धारकांना पदवीप्रदान सोहळ्यात गौरवण्यात यावे. अशी मागणी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी निवेदनाद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर यांच्या कडे केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने नुकतेच पदवीप्रदान सोहळ्याच्या पोषाखामध्ये बदल करून पुर्वीच्या गाऊन व कॅप पोषाखा ऐवजी आता कुर्ता, पायजमा व पुणेरी पगडी असा पोषाख केला आहे . या विरोधात युवक काँग्रेसने तात्काळ आग्रही मागणी करत , महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यास अधिक सन्मान देऊन, त्यांचे समतावादी विचार अधिक खोलवर प्रतिकात्मत स्वरूपामध्ये आपल्या भारतीय व जगाभरातून येऊन पुण्यात शिक्षण घेणा-या विद्यार्थी वर्गामध्ये हि रूजू व्हावेत यासाठी “पुणेरी पगडी” ऐवजी“फुले पगडी” देऊन नवीन पदवी धारकांना पदवीप्रदान सोहळ्यात गौरवण्यात यावे. अशी मागणी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी निवेदनाद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर यांच्या कडे केली आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की,  पुणे विद्यापीठास सावित्रीबाई फुलेंचे नाव देण्यात आले आहे. त्यांनी अपार कष्ट व मेहनत घेऊन पुण्यातच मुलींची पहिली शाळा सुरु केली.  त्यांच्या या कार्यात त्यांचे पती व महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचे ही योगदान फार मोठे आहे.आपण त्यांच्या या कार्यांची व  फुले दाम्पत्याने केलेल्या अनेक मौलिक कार्यांची प्रेरणा, स्फूर्ती व विचारधारा नवीन पदवी धारण करणा-या युवा वर्गांमध्ये व्हावी यासाठी पुणेरी पगडी एवजी फुले पगडी देऊन विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करावे. पुण्यात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांमध्ये अधिक खोलवर रुजवावे यासाठी ”पुणेरी पगडी” एवजी ”फुले पगडी” द्यावी ही मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.