Pimpri : ‘मराठी’लाही अभिजात भाषेचा दर्जा देण्याची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने तेलगू, मल्याळम, कन्नड, संस्कृत, तामिळ आणि ओडिया भाषेला ज्याप्रमाणे अभिजात भाषेला दर्जा आला आहे. त्याप्रमाणे ‘मराठी’ भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी पुण्याच्या बोपोडीतील अंकित मनोज नाईक यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

अंकित मनोज नाईक यांनी मागणी पात्रात म्हटले आहे कि, आपण आपल्या राजकीय प्रचारसभांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा दाखल देता. अन् ‘मराठी’ भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. हा विरोधाभास मन दुखावणारा आहे. मात्र, सुमारे दोन हजार वर्षांचा सांस्कृतिक इतिहास असलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. हे आकलनीय आहे.

  • तसेच पठारे समितीने दिलेल्या अहवालानुसार, अभिजात भाषासंबंधीचे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करत असतानाही इतका विलंब का लागत आहे? हा एकच प्रश्न सुमारे अकरा कोटी मराठी भाषिकांना सतावत आहे. त्यामुळे मराठी भाषेची उपेक्षा करण्याचं धोरण सोडून तिला तिचा योग्य तो मान देण्यासाठी आपण प्रयत्न करावा.
-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.