Pimpri : सोन्याच्या भावात पुन्हा मोठी वाढ, सोनं 43 हजारांवर !

एमपीसी न्यूज- चीनमधील कोरोना व्हायरस नियंत्रणात आल्यामुळे पुन्हा एकदा सोन्याचा भाव वधारला आहे. दिल्लीतील सराफा बाजारात जवळपास आठ दिवसात 1600 रुपयांनी सोन्याचे दर वाढल्याचे दिसून आल्यामुळे गुरुवारी सोन्याचा भाव 43 हजार 170 रुपये झाल्याचे पाहायला मिळाले. ऐन लग्नसराईमध्ये सोने वधारल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसणार आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झालेली पाहायला मिळाली होती. एक किलो चांदीचा भाव 157 रुपयांनी तर सोन्याचे भाव 233 रुपयांनी घटले होते.  हे दर स्थिरावत नाहीत तोपर्यंत गुरुवारी पुन्हा या दरामध्ये वाढ झाली.

आज शुक्रवारी हे दर स्थिर राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर चांदीचे दर सराफ बाजारात तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. चीनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरस नियंत्रणात आल्याने बाजारात तेजी आली आणि त्यामुळे सोनं -चांदीच्या किंमती कमी झाल्याचे या विषयांमधील तज्ज्ञांचे मत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.