-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pimpri: घरात घुसून वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या पळवल्या; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – एलआयसीचे पैसे भरण्याच्या निमित्ताने घरात घुसून चोरट्याने घरातील वृद्ध महिलेच्या हातातून सोन्याच्या बांगड्या काढून नेल्या. ही घटना सोमवारी (दि. 2) दुपारी साडेबाराच्या सुमारास हेमूकलानी गार्डनजवळ जायका चौक पिंपरी येथे घडली.

रंजना सुरेश उत्तरेकर (वय 40, रा. रुपीनगर, निगडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रंजना हेमूकलानी गार्डनजवळ जायका चौक पिंपरी येथे एका घरात घरकाम करतात. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास रंजना ज्या घरात काम करत होत्या त्या घरात एक अनोळखी व्यक्ती आला. त्याने एलआयसीचे पैसे भरण्याचे कारण सांगून घरात प्रवेश केला.

घरात झोपलेल्या वृद्ध महिलेच्या हातातून जबरदस्तीने सुमारे 1 लाख 30 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. चोरटा निघून गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn