Pimpri: जलतरण तलावाच्या तिकीटांमध्ये ‘गोलमाल’; लिपिक निलंबित; खातेनिहाय चौकशी सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावारील तिकिटीमध्ये ‘गोलमाल’ केल्याप्रकरणी क्रीडा विभागातील लिपिकाचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.

किरण शाम भोईर असे निलंबित करण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे. भोईर हे महापालिकेच्या क्रीडा विभागात कार्यरत आहेत. संभाजीनगर येथील साई अँक्वामरिन जलतरण तलावावरील व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी 30 जानेवारी 2019 रोजी तलावाची तपासणी केली असता तलावात 14 नागरिक पोहण्याचा लाभ घेत होते. त्यापैकी सहा पासधारक होते. त्यामुळे 8 तिकिटांची विक्री होणे आवश्यक होते मात्र; चार तिकीटांची विक्री झाल्याचे निदर्शनास आले. तसेच चार तिकीटांवर तारीख आणि वेळेचे शिक्के नव्हते.

  • नागरिकांकडे विचारपूस केले असता तिकीटाचे पैसे भोईर यांच्याकडे जमा केले. परंतु, त्यांनी तिकीट दिले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यानंतर 13 मे 2019 रोजी पुन्हा सहाय्यक आयुक्तांनी तलावाची पाहणी केली असता भोईर कामावर उशिरा आले. तसेच सकाळी सहा ते सातची बॅच सुरु झाली नाही. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान आणि महापालिका रक्कमेचा अपहार केल्याचे दृष्टोपतीस येत आहे. याबाबत भोईर यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. त्याचा भोईर यांनी खुलासा केला. परंतु, आयुक्तांना तो संयुक्तीक वाटला नाही.

भोईर हे शासकीय पैशांचे अपहारस किंवा दुर्विनियोगास जबाबदार असल्याचे सहाय्यक आयुक्तांनी निदर्शनास आणून दिले. भोईर यांनी कर्तव्यात नितांत सचोटी व कर्तव्यत्परता न राखता गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केले आहे. त्यांची सचोटी संशायस्पद असल्याने त्यांना सेवानिलंबित करण्यात आले असून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली आहे.

  • या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद घेतली जाणार आहे. निलंबित काळात भोईर यांना अटी-शर्तींच्या अधिन राहून निर्वाह भत्ता अदा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.