Pimpri : शहरातील चर्चमध्ये सामुदायिक प्रार्थना करुन गुडफ्रायडे उत्साहात

एमपीसी न्यूज – शहरातील विविध चर्चमध्ये आज शुक्रवारी (दि. 19) सामुदायिक प्रार्थना करून, तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करीत गुड फ्रायडे साजरा करण्यात आला. काही ठिकाणी यानिमित्त येशू ख्रिस्ताची भजने गायनाचा कार्यक्रम झाला.

मानव जातीच्या कल्याणासाठी येशूंनी आपल्या प्राणाची आहुती या दिवशी दिल्याने येशू ख्रिस्ताचा हा बलिदान दिन गुड फ्रायडे म्हणून साजरा केला जातो. या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ख्रिस्ती बांधवांकडून चाळीस दिवस उपवास केले जातात. काहीजण फक्त याच दिवशी उपवास करतात. या वेळी येशू ख्रिस्ताच्या सात वचनांचा अर्थ धर्मगुरूंच्या वाणीतून ख्रिश्चन बांधवांनी समजावून घेत ख्रिस्ताची उपासना केली. तसेच, यानिमित्त विविध चर्चमध्ये भजन, प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शहरातील चर्चमध्ये सकाळपासूनच गर्दी झाली होती. दुपारच्या वेळी धर्मगुरुंच्या वाणीतून प्रवचन ऐकण्यासाठी ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये उपस्थित होते.

पिंपरी, चिंचवड, खराळवाडी, दापोडी येथील चर्चमध्ये संदेश आणि प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. येशु ख्रिस्तांना ज्या दिवशी वधस्तंभावर देण्यात आले तो दिवस म्हणजे गुडफ्रायडे होय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.