Pimpri: गोविंद घोळवे यांनी घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट

राज्यातील विविध विषयांवर केली चर्चा

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे राज्य संघटक व ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. शिवसेनेने निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य संघटक व ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांनी ‘मातोश्री’ वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे अर्धातासाहून अधिक काळ राज्यातील प्रश्नावंर प्रदीर्घ चर्चा झाली.

राज्य संघटकपदी नियुक्ती झाल्यापासून घोळवे यांनी पक्षसंघटना वाढीवर भर दिला आहे. राज्यातील पक्ष संघटना वाढीचा आढावा घोळवे यांनी ठाकरे यांना दिला. तसेच राज्यातील ओबीसी समाज आपल्या प्रलंबित प्रश्नांसाठी आक्रमक होत आहे. त्यांच्या प्रश्नांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली. याशिवाय राज्यातील सध्याची राजकीय स्थिती, शिवसेनेची भविष्यातील रणनीतींवर यासह विविध विषयांवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.