Pimpri : सरकार, शासनावर अंकुश ठेवण्याच्या ‘अधिकार’ला सरकार घालतंय कुंपण – काशिनाथ नखाते

राष्ट्रपती,पंतप्रधान यांना पाठविणार पत्र

एमपीसी न्यूज – देशातील लढाऊ कार्यकर्ते यांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर सन २००५ झालेला ऐतिहासिक माहिती अधिकार कायदा कमकुवत करुन आणि माहिती आयोगाच्या स्वातंत्र्य तसेच स्वायत्ततेला सुरुंग लावत केंद्र सरकारने माहिती आधिकार दुरुस्ती विधेयकास मंजुरी देण्यात आली. यामुळे सामान्य नागरिकांना, कार्यकर्त्यांना मिळालेल्या सरकारवर अंकुश ठेवण्याच्या अधिकारास कुंपण घातले जात आहे, असे मत आज कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

कष्टकरी संघर्ष महासंघाकडून माहिती अधिकार कायदा आणि त्यात केलेले बदल याबाबत चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी उपाध्यक्ष राजेश माने, सुभाष राठोड, इरफाण चौधरी, बालाजी लोखंडे, तुकाराम माने, शेशेराव गाइकवाड, महादेव गायकवाड, लता देसाई, सुलोचना मिरपगारे, कविता चव्हाण,अंजना कदम सुरेखा जाधव आदी उपस्थित होते.

  • देशातील कार्यकर्त्याच्या लढाईमुळे अत्यंत महत्वाचा असा माहिती अधिकार कायदा २००५ हा अस्तित्वात आला. सामान्यांना एक शस्त्र मिळाले. यातून सरकारवर अंकुश ठेवत अनेक समाजोपयोगी विषय मार्गी लगले. या कायद्यापूर्वी एक पेपर ही पहायला मिळायचा नाही. मात्र, या कायद्यांने जो दस्त उपलब्ध आहे. तो पाहण्याचा आणि मिळवण्याचा अधिकार मिळाला. तसेच आवश्यक तेथे दाद मागण्यात यश आले. मात्र, त्याचा अडथळा अनेकाना वाटत होता.

केंद्र सरकारने हा कायदा बोथट करुन टाकला आहे. केंद्र आणि राज्यातील माहिती आयुक्तांच्या स्वायत्ततेवर बंधने येणार आहेत. यापूर्वी च्या कायद्यात देशाचे मुख्य माहिती आयुक्त हे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या समकक्ष होते. त्यांचा कालावधी पाच वर्षांचा रहाणार होता. तसेच माहिती आयुक्तांचे वेतन मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याप्रमाणे राहाणार होते. मात्र, यात बदल केले असून आयुक्तांचा कार्यकाळ पाच वर्षाचा असेल असे नाही.

  • त्याचप्रमाणे वेतनाचे ही ठोस नमुद नाही. ते ठरवण्याचा अधिकार सरकारचा असेल, अशा प्रकारचा बदल म्हणजे स्वातंत्र्य संपवणारा आहे. माहिती अधिकार वापर करणारे कार्यकर्ते व नागरिक याना यापूर्वीच राज्यात संबधित विभागात माहिती मागवल्यास टाळाटाळ होत आहे, त्यात आता माहिती मिळणार कि दडपणार? अशी शंका नखाते यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.