रविवार, जानेवारी 29, 2023

Pimpri : आजी शेजारी तासभर गप्पा मारायला गेल्या आणि घरात झाली चोरी

एमपीसी न्यूज – 60 वर्षाच्या आजीबाई (Pimpri) सायंकाळी शेजारी गप्पा मारायला गेल्या आणि घरात चोरी करून चोरट्यांनी घर साफ केले. ही घटना रविवारी (दि.22) सायंकाळी सहा ते सात वाजताच्या कालावधीत कुदळे कॉलनी, पिंपरी गाव येथे घडली.

याप्रकरणी 60 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PMPML : पीएमपीएमएलच्या पिंपरी आगारातील फिटर मुलाणी यांनी बनवले ‘फिरते वॉशिंग’ सेंटर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचा घराचा (Pimpri) दरवाजा पुढे करून शेजारी गेल्या. तासभर गप्पा मारून त्या परत आल्या असता त्यांच्या घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले.

घरातील कपाटात ठेवलेले एक लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Latest news
Related news