Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पार्थ पवार यांचा मतदारसंघात अभिवादन दौरा

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज संपूर्ण मतदारसंघात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन दौरा केला. पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, देहूरोड शहराध्यक्ष कृष्णा दाभोळे, सामाजिक कार्यकर्ते धर्मपाल तंतरपाळे, देहूरोड कॅन्टोन्ममेंट चे नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, लोणावळा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड तसेच आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

  • आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने उमेदवार पार्थ पवार यांनी मतदारसंघात असलेल्या सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने देहूरोड आणि लोणावळा येथे भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भव्य दुचाकी रॅलीला सुरुवात करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार आपण रुजवले पाहिजेत. रोजच्या आयुष्यात जगत असताना डॉ. बाबासाहेबांच्या विचार आचरणात आणून जगले पाहिजे. डॉ. बाबासाहेबानी राज्यघटना बनवून आपल्याला एक वेगळी ताकद दिली आहे. त्याचा वापर हा योग्य प्रकारे झाला पाहिजे. मतदानाचा हक्क देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मिळवून दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात योग्य उमेदवार निवडून देण्याचा आवाहन पार्थ पवार यांनी जनतेला केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.