Pimpri : संभाजी ब्रिगेडच्यावतीने राजमाता जिजाऊंना अभिवादन

एमपीसी न्यूज – संभाजी ब्रिगेडच्यावतीने राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

या शिबिराचे उदघाटन नगरसेवका अश्विनी चिंचवडे व मराठा सेवा संघाचे प्रकाश जाघव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. मोहन पवार, जिल्हाकार्याध्यक्ष गणेश दहिभाते, शहरकार्याध्यक्ष वैभव जाधव, संपर्क प्रमुख नकुल भोईर आदी उपस्थित होते. हे शिबिर पुढील दहा दिवस डॉ. अश्विनी पवार व डॉ. हर्षा टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

या कार्यक्रमाल संभाजी ब्रिगेडचे लहु लांडगे, रशिद सय्यद, चैताली भोईऱ, सतीश कदम, भैय्या गजधने, अंतीम जाधव, सतीश काळे, वैभव सावंत, अंकुश कालेकर, शिवनाथ दिलपक, सतीश जारकर आदी शिबिरात उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.