Pimpri : कष्टकरी संघर्ष महासंघाकडून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांनी कामगारांचे जीवन साहित्यात प्रतिबिंबित करुन त्याना न्याय देण्यासाठी अविरत प्रयत्न केले. माणसाला माणुसकीने वागवा, तो गुलाम नाही, असे सांगत कामगारांचे अंधारमय जीवन तेजाप्रमाने व्हावे. त्यांचा हक्क मिळवून त्यांना ताठ मानेने जगायला शिकवले, असे मत कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यानी व्यक्त केले.

महासंघाचे कार्यालयात अण्णा भाऊ जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष राजेश माने, जिल्हा निमंत्रक शेषेराव गायकवाड, चंद्रकांत कुंभार, उमेश डोर्ले, धर्मेंद्र पवार, शांता चव्हाण, अर्चना जाधव, सैफल शेख, रज्जाक सय्यद, भास्कर राठोड़, महादेव गायकवाड, राजकुमार पाटील, कांता मोटे, सुनंदा अल्गुर आदी उपस्थित होते.

  • यावेळी नखाते म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून महागाई आंदोलन, गिरणी कामगारांची आंदोलने त्यांच्या वर्गीय लढ्याला अधिक धार दिली. बहुदा त्यांच्या शाहिरीत व वगनाट्यात लोकचळवळ आणि लढ्याचा भाग अधिक असायचा. आता वळू नका आणि पळू नका, कुणि चळू नका, श्रमजीवी जनतेविषयी दांडगा कळवळा आणि सहानुभूती त्यांच्या लेखनात होती.

देशावर अत्यंत निष्ठा बाळगणारे अण्णा भाऊंनी जागतिक घडामोडीचे अवलोकन करत त्याची नोंद ठेवली. त्याचा प्रत्यय साहित्यात येतो. माणसाला माणूस म्हणून वागवा तो गुलाम नाही, समस्त कामगार वर्ग गुलाम नाही, अशा विचारातून त्यांनी कामगारांचे प्रभोधन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.