Pimpri: महापालिकेतर्फे छञपती शाहू महाराज यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छञपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहूल जाधव आणि स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, ‘अ’ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसदस्या अनुराधा गोरखे, मंगला कदम, नगरसदस्य केशव घोळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, कोल्हापुर जिल्हा मित्र मंडळाचे पांडुरंग पाटील, जगदीश परीट, कुशाग्र कदम, मिलिंद वेल्हाळ, सुनिल पाटील, योगेश मोटे, पी.बी.पाटील, पी.वाय.पाटील आदी उपस्थित होते.

  • तसेच चिंचवड येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासही महापौर राहूल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, बापू गायकवाड, संभाजी पार्टे, मिलिंद वेल्हाळ आदी उपस्थित होते.

रिपल्बिकन पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहर अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने राजर्षी छञपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शहराध्यक्ष अल्ताफ शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब रोकडे, जिलनी सय्यद, आसिफ शेख, सालेम सय्यद, युवराज वाघमारे, राहुल पवार, रफिक शेख उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.