Pimpri : महापरिनिर्वाणदिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात विविध सामाजिक संस्था व संघटनाच्यावतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमत्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस, महापौर राहुल जाधव आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळीअप्रभागअध्यक्षाअनुराधागोरखे, नगरसदस्यासुलक्षणाशिलवंत – धर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे,मुख्यलेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे,मुख्य लेखापरिक्षक अमोद कुंभोजकर,नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आदी उपस्थित होते.

त्यानंतरपिंपरी येथील त्यांच्या पुतळयास महापौर राहुल जाधव व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत – धर, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, माजी नगरसेवक  मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, तुकाराम गायकवाड, गिरीष वाघमारे, आनंदा कुदळे, शाम सोनवणे, प्रताप गुरव, सविता खराडे, जयश्री प्रसाद, सुरेश गायकवाड, दिलीप दिधाडे, लहू अनारसे, दिलीप काकडे आदी  उपस्थित होते.त्यानंतर एच.ए कॉलनी पिंपरी येथील पुतळयास महापौर राहुल जाधव यांनी त्यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक  सुलक्षणा शिलवंत –धर अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशा राऊत आदी उपस्थित होते.
तसेच दापोडी येथे महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेवक राजू बनसोडे, रोहित काटे,  नगरसेविका  आशा धायगुडे – शेंडगे, स्वाती काटे,सहाय्यक आयुक्त आशा राऊत, अण्णा बोदड, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, मुख्य आरोग्य निरीक्षक अजय जाधव, सहाय्यक उद्यान अधिक्षक जे व्ही पटेल, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.

रहाटणी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकराना “स्मृती दिना” निमित्त विनम्र अभिवादन” करण्यात आले.  यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमोल भालेराव, सामाजिक कार्यकर्ते विलास पोळ, सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव मुख्याध्यापिका श्राबानी पत्रनाभिश   तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी , विध्यार्थी, पालक उपस्थित होते.  यावेळी प्रमुख मान्यवरांच्या  हस्ते  डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी “शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाचे माणसाला आपले  कर्तव्य व हक्काची जाणीव होतो. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत: ची जाणीव व्हावी यासाठी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, अनेक क्षेत्रात अतुल्यनीय योगदानामुळे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक भारताचे जनक आहेत”  असे संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार ह्यांनी उद्गार काढले. यावेळीविद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूवर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्राबानी पत्रनाभिश  यांनी सूत्रसंचालन केले व आभार  हेमा शेलार यांनी मानले.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने महामानव भारतरत्न डाॅ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या ६२व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी चौकातील डाॅ.बाबासाहेब यांच्या पुतळ्यास व संविधानाच्या प्रास्ताविकाच्या कोनशिलेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे उपाध्याक्ष गौतम आरकडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासिर चौधरी, शहर सरचिटणीस गौरव चौधरी, अनिकेत आरकडे तसेच अक्षय सोनपारखे, पांडूरंग वीर,विशाल कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाच्या अजमेरा कॉलनी येथील कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाकॉंग्रेस पर्यावरणविभागाच्या वतीने विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षआणि निगार बारस्कर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मंगल ह्यांनी प्रतिमेचे पूजन केले.

यावेळी अशोकराव मोरे, अशोक मंगल, निगारताई बारस्कर, श्याम अगरवाल, आयुष मंगल, जयराम शिंदे, दिलीप पांडारकर, हर्षवर्धन पांडारकर, दीपक थोरात, राजेंद्र लोंढे(महाराज) ,केशव परिहार,  निसार बारस्कर, आबा खराडे, राजेश नायर, मिताली चक्रवर्ति, सुरेश कानितकर,  वैशाली नलगे, जयश्री काननाइके, नवनाथ डेंगळे उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगांव दाभाडे येथील घरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सी. आर. सामाजिक संघटनेचे मावळ तालुका अध्यक्ष अहमद बेग व उपाध्यक्ष अमोल रत्नाकर गायकवाड   यांनी पुष्पहार घालून महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी तळेगांव दाभाडे स्टेशन शाखा प्रमुख धीरज गायकवाड आणि इतर कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.