BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महापालिका भवनात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय भोसले, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, सेवानिवृत्त अधिकारी शरद जाधव, वसंत साळवी, रवींद्र दुधेकर आदी उपस्थित होते.

  • त्यानंतर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या पुतळ्यासही अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व दिलीप गावडे यांनी पुष्पहार अर्पण करुन महामानवाला अभिवादन केले. तसेच एच.ए.कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व दिलीप गावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी एच ए कंपनीचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन पर्वानिमित्त आयोजित रांगोळी प्रदर्शनाला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट दिली. तसेच रांगोळीतून साकारलेल्या महापुरुषांच्या चित्रांचे त्यांनी कौतुक केले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.