Pimpri : थेरगावमधील खिंवसरा पाटील संकुलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

एमपीसी न्यूज – थेरगाव, गणेशनगर मधील खिंवसरा पाटील शिक्षण संकुलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे ॲड. पी. एस. कांबळे, मातृसेवा सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते सुहास गोडसे व त्यांची कन्या शाळेची माजी विद्यार्थिनी संस्कृती गोडसे, पालक वामन कदम, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, संचालक गतीराम भोईर, अशोक पारखी, नितीन बारणे, लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, खिंवसरा पाटील विद्यामंदिर चे मुख्याध्यापक नटराज जगताप, बालवाडी विभाग प्रमुख आशा हुले, खिंवसरा पाटील शिक्षण संकुल मधील सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते.

  • गौतम बुद्ध व महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पुजनाने बुद्धवंदना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात झाली. लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर व आठवी-नववी चे विद्यार्थी यांनी “जिजाईचा तो शिवा, भिमाईचा तो भिवा” हा पोवाडा अभिनयासहित अत्यंत प्रभावीपणे सादर केला. विद्यार्थी मनोगतामध्ये नेहा सातारकर, सोनाली कदम, पायल गायकवाड, प्रांजल गायकवाड, आकांक्षा गायकवाड या विद्यार्थिनींनी “भीमराज की बेटी, मै तो जय भीमवाली हूं।” “जीवाला जीवाचे दान दिले भीमाने ; माणसाला माणूसपण दिले प्रेमाने.” ही गीते गाऊन बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य प्रकट केले.

शिक्षिका अंजली चोळके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच पालक वामन कदम यांनी शाळेच्या उपक्रमांचे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे कौतुक केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी मनुष्य म्हणून जगा असा संदेश सर्वांना दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अॅड. पी. एस. कांबळे यांनी जगातले व भारतातले आदर्श विद्यार्थी बाबासाहेब आंबेडकर कसे ठरले हे बाबासाहेबांनी भारतात व परदेशात शिक्षणासाठी कसे कष्ट केले याचे वर्णन करून सांगितले. तसेच शाळेने बाबासाहेबांचा आदर्श घेऊन भविष्य घडवावे असाही मोलाचा सल्ला दिला. सुहास गोडसे व त्यांची कन्या संस्कृती गोडसे यांनी शाळेला प्रिंटर भेट दिला.

  • कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय सुनीता घोडे, सूत्रसंचालन वनिता जोरी व आभार प्रदर्शन आशा हुले या शिक्षकांनी केले. सरणात्य म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

    यानंतर परिवर्तन सोशल फाऊंडेशन,गणेशनगर, थेरगाव आयोजित क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९२ व्या व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या संयुक्त जयंतीनिमित्त विदयार्थ्यांसाठी सकाळी ९ ते ११ या वेळेत फुफ्फुस कार्य चाचणी व दंत चाचणी या आरोग्य तपासणीचे शिबिर शाळेत आयोजित करण्यात आले. यामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.