Pimpri: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मोरवाडी येथील भाजप पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विकासाचा लाभ तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करावे, असे आवाहन आमदार जगताप यांनी  केले.यावेळी खासदार अमर साबळे, आमदार  महेश लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश महिला मोर्चाच्या उमा खापरे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, माजी उपमहापौर शैलजा मोरे, शहर सरचिटणीस प्रमोद निसळ, अमोल थोरात,  माउली थोरात, नगरसेवक  विलास मडीगेरी, नामदेव ढाके, शीतल शिंदे, मोरेश्वर शेडगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, दत्तात्रय चौगुले, माजी नगरसेवक राजू दुर्गे, भीमा बोबडे, विजय लांडे, विजय शिनकर आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, “माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे रत्न आहेत. देशासाठी त्यांनी केलेले कार्य मोठे होते. त्यांनी दाखवलेल्या वाटेवरूनच पक्ष कार्यकर्त्यांना मार्गक्रमण करायचे आहे. त्यांनी देशातील तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत विकास पोचवण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काम करावे.
यावेळी पक्षाचे प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी यांनीही मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.