Pimpri: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान  दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

आज सकाळी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले आदी उपस्थित होते.

त्यानंतर माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.