Pimpri : लहूजी वस्ताद साळवे आणि क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लहूजी वस्ताद साळवे आणि क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथी निमित्त चिंचवड स्टेशन येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर राहुल जाधव आणि सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासनन अधिकारी रामकिसन लटपटे, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम.शिंदे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, अमित गोरखे, युवराज दाखले, सुरेश जोगदंड, सागर गायकवाड, विशाल कसबे, मनोहर वाघमारे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.