Pimpri: माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या अनुराधा गोरखे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के.अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त आशादेवी दूरगुडे, अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपीक रमेश भोसले, मनोज माछरे, रवि राठोड, सिताराम राठोड, रावसाहेब राठोड, संजय जाधव, दिलीप आडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.