Pimpri : महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त महापालिका प्रशासकीय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांचे हस्ते पुष्षहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक हे उपस्थित होते.

त्यानंतर निगडी येथील महाराणा प्रतापसिंह यांचे पुतळ्यास महापौर ढोरे यांचे हस्ते पुष्षहार अर्पण करण्यात आला.  यावेळी नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजपूत समाज संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार बायस, सुरेश सुर्यवंशी, श्रीराम परदेशी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे, उपमहापौर तुषार हिंगे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्य उत्तम केंदळे यांनीही पुष्षहार अर्पण करून अभिवादन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like