Pimpri : महापालिकेकडून हुतात्मा बाबू गेनू यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने हुतात्मा बाबू गेनू यांच्या शहिद दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महापौर राहुल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते हुतात्मा बाबू गेनू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीत झालेल्या या अभिवादन कार्यक्रमास अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर राहुल जाधव म्हणाले, “12 डिसेंबर हा दिवस स्वदेशी आंदोलनातील अत्यंत महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी 1930 साली बाबू गेनू यांनी स्वदेशी आंदोलनासाठी आपले बलिदान दिले. त्यामुळे आजच्या दिवसाला स्वदेशी दिवस म्हणून देखील ओळखले जाते. इंग्लंडमध्ये इंग्रजांच्या कंपन्यांना कच्चा माल पुरविण्यासाठी तसेच त्यांच्या कंपन्यांमध्ये तयार झालेला पक्का माल विकण्यासाठी भारत हा बाजारपेठ म्हणून ओळखला जात होता. इंग्रजांच्या या नीतीला विरोध करण्यासाठी सुरु झालेल्या स्वदेशी आंदोलनातील बाबू गेनू हे पहिले हुतात्मा आहेत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.