Pimpri: महापालिकेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर राहुल जाधव यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीतील त्यांच्या प्रतिमेस व पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्या माधवी राजापुरे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे,सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

पिंपरी येथे झालेल्या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्या माधवी राजापुरे, माजी महापौर वैशाली घोडेकर, अर्पणा डोके, माजी नगरसदस्या गिरीजा कुदळे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्याधिकारी एम.एम.शिंदे, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, अनिल साळुंके, हणुमंत माळी, विलास गव्हाणे, काळुराम गव्हाणे, लहु अनारसे, हिरामण भुजबळ, आप्पा राऊत, सुरेश गायकवाड, वैजनाथ क्षीरसागर, अमर ताजणे, संतोष जोगदंड, शिवशंकर उबाळे, गिरीष वाघमारे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.