Pimpri: महापालिकेतर्फे राजीव गांधी यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर राहूल जाधव यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे आदी उपस्थित होते.

  • तसेच दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त महापालिका भवनात अधिकारी, कर्मचा-यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी सामुहिक प्रतिज्ञा घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.