Pimpri : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन 

एमपीसी न्यूज – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

पिंपरी, खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला मुख्य संघटक व माजी नगरसेवक अरूण बो-हाडे, महिला कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, वर्षा शेडगे,‍ शिल्पा बिडकर, गंगा धेंडे, मंगल पानसरे, अनिता पानसरे, नलिनी भोसले, उषा पवार, सविता खराडे, आशा शिंदे, सविता धुमाळ, कविता ताटे, दिपाली देशमुख, मंगल ढगे, सुनील आडागळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.