Pimpri: राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताचे माजी उप पंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिका भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच वल्लभनगर बसस्थानकाजवळील आणि कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

महापालिका मुख्यालयात आज (सोमवारी) झालेल्या या कार्यक्रमास सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, जैव विविधता व व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, नगरसदस्या अनुराधा गोरखे, नगरसदस्य संतोष कांबळे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी राजेश आगळे, वामन मेमाणे, जनता संपर्क अधिकारी रमेश भोसले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.