BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पोलिसांना शिबिरात मूत्रपिंड विकार तपासणीबाबत मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलीस ठाणे आणि डॉ. मनीष माळी यांच्या वतीने पिंपरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मूत्रपिंड (किडनी) विकारावरील आजारांच्या चाचण्यां, तपासणी शिबिर घेण्यात आले. तपासण्यांसह डॉ. माळी यांनी मार्गदर्शनही केले.

यावेळी पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे, डॉ. मनीष माळी, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात पोलीस कर्मचाऱ्यांच्या किडनी विकाराशी संबंधित तपासण्या करण्यात आल्या.

  • पोलिसांच्या कामाच्या वेळा निश्चित नसतात. जागरण, अनियमित जेवण याचा त्यांना नियमितपणे सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्यात किडनी विकार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे डॉ. मनीष माळी यांच्या वतीने तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

याबरोबरच डॉ. माळी यांनी उपस्थितांना किडनी विषयक माहिती, त्याचे विकार आणि उपचारपद्यती, किडनी विकार होवू नये म्हणून घ्यायची काळजी यासंबंधी त्यांनी माहिती दिली.

HB_POST_END_FTR-A2