Pimpri : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ‘युवा नेतृत्व विकास शिबिर’मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे जिल्हा यांच्या वतीने घेण्यात आलेले दोन दिवसीय निवासी- युवा नेतृत्व विकास शिबिर कासारवाडी येथील ज्ञानराज महाविद्यालयात शनिवार (दि. 18) आणि रविवारी (दि. 19) घेण्यात आले.

या शिबिराचे उदघाटन 18 जानेवारी रोजी मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजच्या प्राचार्या गीता जोशी, महानगर अध्यक्ष प्रा. शिल्पा जोशी, पुणे जिल्हा संयोजक आदित्य पवार व शिबिरप्रमुख संभाजी शेंडगे यांच्या हस्ते झाले.

शिबिरात विद्यार्थ्यांना नेतृत्व विकास, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद परिचय व सैद्धांतिक भूमिका, आजचा तरुण युवक कसा असावा?, सोशल मीडियाचा रचनात्मक वापर कसा करावा, भाषण कसे करावे?, समाजात विद्यार्थ्यांची वागणूक कशी असावी? याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले.

शिबिरात पुणे जिल्ह्यातील 40 महाविद्यालयातील 44 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 19 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता शिबिराचा समारोप झाला. यावेळी पिंपरी चिंचवड महानगर मंत्री तेजस चवरे यांनी विद्यार्थी परिषदेची आगामी दिशा मांडली. जिल्हा संयोजक आदित्य पवार यांनी शिबिराचा समारोप केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.