Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात गुरुनानक जयंती उत्साहात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गुरुनानक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील गुरुद्वारांमध्ये कीर्तन करण्यात आले. तसेच विविध सामाजिक उपक्रमांनी आजचा दिवस साजरा झाला.

यावर्षी गुरुनानक यांची 550 वी जयंती देशभर साजरी करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरात देखील अमृतवेला ट्रस्ट आणि शीख बांधवांच्या वतीने पिंपरी मधील लाल मंदिर येथे पहाटे कीर्तन झाले.

गुरुप्रीत सिंग (रिंकूजी) यांनी ही कीर्तनसेवा दिली. यावेळी मुकेश फेरवानी, नरेश वालेचा, उमेश नानकानी, पेरविंदर छतवाल, घनश्याम अडवाणी, सनी कपूर, नरेश नेभवानी, विनोद पंजाबी आदी उपस्थित होते. शीख बांधवांच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील 550 गरजू आणि गरीब कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले.

गुरु नानक जयंती निमित्त देशभरात कीर्तन आणि लंगरचे आयोजन केले जाते. गुरु नानक यांनी मानव सेवेसाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले. भारत आणि आसपासच्या अनेक देशांमध्ये जाऊन त्यांनी सामाजिक कुप्रथांचा विरोध करून मानवतेचा संदेश दिला. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गुरु नानक जयंती साजरी केली जाते. गुरु नानक जयंतीचा दिवस प्रकाश पर्व तसेच गुरु पर्व म्हणून साजरा केला जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.