Pimpri: नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या वतीने गुरुपूजन

Pimpri: Gurupoojan on behalf of Nandkishore Cultural Society देशाच्या विविध भागातील 200 शिष्यांनी डॉ. कपोते यांना ऑनलाईन माध्यमातून वंदन केले व आशिर्वाद घेतले.

एमपीसी न्यूज- नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या वतीने दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त डॉ. कपोते यांनी आपले गुरू पंडित बिरजू महाराज यांचे व्हिडिओ कॉलद्वारे आशीर्वाद घेतले तसेच सर्वांना गुरूपोर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी डॉ. नंदकिशोर कपोते यांच्या शिष्या प्रिंसी ओझा, ऋतुजा साळवे, प्रज्ञा शिंदे, भावना सामंत व अनुष्का सामंत यांनी गुरू कपोते यांना अभिवादन करून आशिर्वाद घेतले. देशाच्या विविध भागातील 200 शिष्यांनी डॉ. कपोते यांना ऑनलाईन माध्यमातून वंदन केले व आशीर्वाद घेतले.

शिष्यांना मार्गदर्शन करताना डॅा. कपोते म्हणाले की, कोरोना संकटाचा सामना धैर्याने करावा. कामाशिवाय घराबाहेर पडू नये व स्वतःची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नृत्य हा एक सर्वांग सुंदर व्यायाम आहे. सर्वांनी घरीच रोज नृत्यकलेचा रियाज करावा व सरकारी नियमांचे पालन करावे असा संदेश डॅा. कपोते यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.