Pimpri: पाच महिने जिम बंद ठेऊन किती पेशंट कमी झाले? जिम व्यावसायिकांचे पालिकेसमोर आंदोलन

Pimpri: Gym professionals protest in front of the municipality जिम व्यावसायिकांना लाखो रुपयांची थकीत भाडे, कर्मचारी पगार, वीज बिल, दुरुस्ती खर्च कसा भागवायचा याची चिंता लागली आहे.

एमपीसी न्यूज – ‘मागील पाच महिने जिम बंद ठेऊन किती पेशंट कमी झाले’, ‘ओपन जिम चालू तर इनडोअर का नाही’, ‘जिमचे भाडे कसे भरायचे, बँकांचे हप्ते कसे फेडणार’, ‘जिम बंद राहील, तर देश फिट कसा राहील’ असे विविध प्रश्न विचारत जिम चालू करण्यास परवानगी देण्यासाठी ट्रेनर, व्यावसायिकांनी आज (दि.6) आंदोलन केले.

पिंपरी पालिकेच्या प्रवेशद्वारावर सुरु असलेल्या आंदोलनात जिम चालक सागर गोधनगावे, संदेश नलावडे, विक्रम धुमाळ, नितीन गराळ, अविनाश इंदलकर यांच्यासह मालक, ट्रेनर, हाऊसकीपिंग कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. माजी उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

दरम्यान, मागील पाच महिन्यांपासून जिम व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. महाराष्ट्रातील 15 हजार जिम चालक, मालक, ट्रेनर, हाऊसकीपिंग स्टाफ, योगा, झुंबा टीचर, डायटीशियन, मसाजिस्ट, न्यूट्रिशेन दुकानाचे मालक, त्यांचे कर्मचारी, कंपनीचे कामगार, व्यायाम शाळा साहित्य बनवणारे कामगारासंह अनेक पुरक व्यवसायातील कामगार हे पाच महिन्यांपासून बेरोजगार आहेत.

त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जिम व्यावसायिकांना लाखो रुपयांची थकीत भाडे, कर्मचारी पगार, वीज बिल, दुरुस्ती खर्च कसा भागवायचा याची चिंता लागली आहे. यामुळे अनलॉक तीनमध्ये जिम सुरु करण्याची परवानगी देण्याची आंदोलकांची मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.