Pimpri : ग्रॅच्युईटी व इतर मागण्यांसाठी एच.ए.निवृत्त कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज- पिंपरीच्या एच.ए.कंपनीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. 12) कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले.

हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीमध्ये ३५-४० वर्षे सेवा करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्काची ग्रॅच्युईटी व इतर देण्यांसाठी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. समाजातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळण्याऐवजी हक्काच्या पैशांसाठी संघर्षाची भूमिका घ्यावी लागावी, हे अत्यंत गंभीर असल्याची प्रतिक्रिया एच.ए.कामगार संघटनेचे उपाध्यक्ष अरुण बोऱ्हाडे यांनी व्यक्त केली आहे. एच.ए.कामगार संघटना या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.