Pimpri: ‘एचए’ कंपनीचा रोग दूर करणार -मनोज कोटक

एमपीसी न्यूज – हिंदुस्थान अँण्टीबायोटिक्स (एचए) कंपनी रोगाचे निदान करणार्‍या दवा निर्माण करणारी कंपनी आहे. सध्या कंपनीची अवस्था पाहता, लागलेला रोग दूर करणार असल्याचे एचए मजदुर संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष खासदार मनोज कोटक यांनी सांगितले. तसेच पुरेपुर लक्ष देऊन आपण काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

मजदुर संघाच्या अध्यक्षपदी नियुक्‍ती झाल्यानंतर खासदार कोटक यांनी आज (सोमवारी) पहिल्यांदाच कंपनीला भेट दिली. कंपनीची पाहणी केली. यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे, बीएमएसचे अध्यक्ष आण्णा धुमाळ, एचए मजदूर संघाचे सरचिटणीस सुनिल पाटसकर यांच्यासह कामगार उपस्थित होते.

पैसे आणि व्हीआरएसने कामगारांचे प्रश्‍न सुटत नाहीत. एचए कंपनी जगली तरच कामगारांचे प्रश्‍न सुटणार असल्याचे सांगत खासदार कोटक म्हणाले, असंघटित कामगारांसाठी सरकारने 29 प्रकारच्या योजना राबवल्या आहेत. त्यामुळे एचएचे प्रश्‍नही सोडविले जातील. कंपनीच्या उभारणीमध्ये कामगारांनीही सहभाग देणे गरजेचे आहे. व्यवस्थापनाने कामगारांना दुजाभावाची वागणूक न देता मुलासारखे ठेवावे. कामगारांना दूर करून मार्ग निघणार नाही. ही सरकारची कंपनी आहे. खासगी कंपनी नाही. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने युनियन सोबत चर्चा करावी, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.