BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: विविध मागण्यांसाठी ‘एचए’च्या कर्मचा-यांचे आंदोलन

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – किरकोळ रजा, ग्रॅज्युईटी आदीसह विविध लाभांपासून निवृत्‍त कामगार वंचित राहिले आहेत. त्याच्या निषेधार्थ आणि प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिंदुस्थान अँण्टीबायोटिक्स (एचए) निवृत्‍त कर्मचारी संघटनेच्या वतीने कंपनी प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

ग्रॅज्युईटी अ‍ॅक्ट 1972 प्रमाणे अद्यापही कामगारांना ग्रॅज्युईटी मिळाली नाही. शिल्‍लक अर्जित रजेचा आर्थिक लाभ आणि कामगारांच्या किरकोळ रजेचा आर्थिक लाभ मिळालेला नाही.

एलटीसीचा लाभ रखडलेला आहे. 2009 मध्ये वेतनकरार करण्यात आला. त्या वेतन कराराप्रमाणे वेतन फरक देण्यात आलेला नाही. हा लाभ मिळावा, यासाठी निवृत्‍त कर्मचारी संघटनेच्या वतीने कंपनी प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

HB_POST_END_FTR-A2

.