Pimpri : गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने तरुणाच्या डोक्यात कोयता मारला

एमपीसी न्यूज – रस्त्यावर मध्यभागी पार्क केलेली गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने एकाने आपल्या मित्राला बोलावून घेऊन तरुणाला मारहाण केली. लोखंडी कोयता डोक्यात घातला. ही घटना गुरुवारी (दि.7)सायंकाळी सहाच्या सुमारास बौंधनगर, पिंपरीरोड येथे घडली.

याप्रकरणी अभिजीत गायकवाड, अक्षय वाघमारे, स्वप्नील गाडे, जीवन गालभाडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुणाल भाऊसाहेब रोकडे (वय 19, रा. बौंधनगर, पिंपरी)यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कुणाल आणि त्याचा मित्र विठ्ठल गुरुवारी सायंकाळी बौंधनगर येथून घरी जात होते. आरोपी अभिजित हा रस्त्याच्या मध्यभागी गाडी पार्क करुन मोबाईल फोनवर बोलत होता. फिर्यादी कुणाल याने त्याला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने आरोपी अभिजित याने त्याच्या मित्रांना बोलावून घेतले. कुणाल आणि त्याचा मित्र विठ्ठल या दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तर, आरोपी अक्षय वाघमारे याने लोखंडी कोयता कुणाल याच्या डोक्यात घातला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.