Pimpri : दिव्यांग जलतरणपट्टू केमिला पटनायकला दोन लाख रुपये निधी देऊन केले सन्मानित

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथील रहिवासी जलतरणपट्टू केमिला पटनायक या दिव्यांग खेळाडूंने अबु धाबी येथे पारपडलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत जलतरण या खेळामध्ये रजत आणि कांस्य पदक पटकावले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभागाचे सभापती तुषार हिंगे यांच्या पुढाकाराने आणि भाजयुमोचे राहुल शिंदे आणि मिथुन कुमार यांच्या प्रयत्नातून केमिला पटनाईकला पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावणी हार्डीकर आणि महापौर राहुल जाधव यांच्या हास्ते दोन लाख रुपये निधी देऊन सन्मानित करण्यात आले.

  • याप्रसंगी भाजयुमो शहराध्यक्ष तथा नगरसेवक रवि लांडगे, वैशाली खाडये, दिपक नागरगोजे, अजित कुलथे, प्रविण सिंग, धनंजय शाळिग्राम, योगेश सोनवणे, गणेश जवळकर, अमित गुप्ता, सचिन ढवळे, नागनाथ गुट्टे, दीपक शर्मा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.