BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : भक्तीपूर्ण वातावरणात हनुमान जयंती उत्साहात साजरी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – “अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान “, “अंजनी के प्यारे हनुमानजी” यांसारखी भक्तीगीते आणि चहुकडे घुमणारा हनुमान चालिसा, महामंत्र अशा भक्तीपूर्ण वातावरणात पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद वाटपाचे कार्यक्रम घेण्यात आले.

शहरांसह उपनगरामध्ये हनुमान मंदिरांना विद्युत रोषणाई केली होती. पहाटे पाच वाजल्यापालून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी मंदिरामध्ये पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी होमहवन, अभिषेक, हनुमान चालिसा , महामंत्र आणि महाआरती यासारखे धार्मिक कार्यक्रम झाले.

दर्शनासाठी लागलेल्या रांगा, प्रसाद वाटपासाठी कार्यकर्त्यांचे चाललेले प्रयत्न, भाविकांकडून हनुमानाच्या नावाचा होणारा जयघोष असे भक्तीपूर्ण वातावरण मंदिराच्या परिसरात होते.

HB_POST_END_FTR-A4

.