Pimpri : खुशिया दस्तके देंगी , मस्तीया फिरसे लौंटेगी; ‘नॉव्हेल’च्या हृदयस्पर्शी व्हिडिओमुळे विद्यार्थी, पालक भावूक

शाळेच्या आठवणींच्या व्हिडीओची शैक्षणिक क्षेत्रात जोरदार चर्चा ; विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत परतण्याचा आशावाद : 'Happiness will knock, fun will return' '; Students, parents passionate about the heartbreaking video of 'Novel'

एमपीसीन्यूज : मागील सहा महिन्यांपासून देश कोरोनासारख्या विषाणूशी लढा देत आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी देशभरातील शाळा अद्याप सुरु झाल्या नाहीत. शैक्षणिक वर्ष कधी सुरु होईल हे सांगता येत नाही. यामुळे विद्यार्थी घरात बसून आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये एकप्रकारचे नैराश्य आले आहे. हे वातावरण दूर करण्यासाठी चिंचवड- संभाजीनगर येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थ्यांसाठी एक हृदयस्पर्शी व्हिडीओ तयार केला आहे. खुशिया दस्तके देंगी , मस्तीया फिरसे लौंटेगी , असा संदेश देत विद्यार्थ्यांनी पुन्हा लवकरच शाळेत परतण्याचा आशावाद जागवत मनोधैर्य उंचाविले आहे. या व्हिडीओची शैक्षणिक क्षेत्रात जोरदार चर्चा आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात 23 मार्चपासून लॉकडाऊन लागू केला होता. त्यानंतर जून महिन्यापासू अनलॉक सुरु केला. पण, वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष शाळा सुरु करणे अशक्य आहे.

कोरोनामुळे प्रत्यक्ष शिक्षण थांबले आहे. काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण चालू केले आहे. ऑनलाईन शिक्षण देत असताना अनेक मर्यादा येत आहे. हे शैक्षणिक वर्ष होईल की नाही हे सांगता येत नाही.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी घरातच गेली. आता शाळाही बंद आहेत. यामुळे विद्यार्थी मागील सहा महिन्यांपासून घरी बसून आहेत. ‘ना मित्रांसोबत फिरण्याची मजा, ना शाळेच्या मैदानावर खेळण्याचा आनंद’. या परिस्थितीवर भाष्य करणारा नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलने एक अतिशय चांगला व्हिडीओ तयार केला आहे.

या व्हिडीओत विद्यार्थी म्हणतात, खुशिया दस्तके देंगी, मस्तीया फिरसे लौंटेगी, ‘जो रुका ओ फिर दौडेगा, दुरिया फिरसे कम होगी’, ‘रौनके फिरसे बरसेगी, एक नया जुनून लौटेगा’, ‘आज तू ठेर जा, कल फिरसे दुनिया घुमेंगे, आसमा छुहेंगे” हा व्हिडीओ पाहून अनेक विद्यार्थी शाळेच्या आठवनीने भारावून जात आहेत.

या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही मनोधैर्य खचू देवू नका, लवकरच शाळा सुरु होतील आणि पुन्हा विद्यार्थ्यांनी गजबजलेले चित्र दिसेल. मुले खेळताना, बागडताना दिसतील. आनंदाचे वातावरण दिसेल.

लवकरच आपण कोरोनाच्या परिस्थितीवर मात करु असा आशावाद व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.

मुलांनी बहरलेल्या शाळा, खेळणारे मुले, पालक मुलांना शाळेत आणून सोडतानाचे चित्रीकरण आहे. शाळेची घंटा वाजते. शिक्षक येतात हे नेहमीचे चित्र कोरोनाच्या परिस्थितीत जूनपासून बंद आहे. शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये एकप्रकारचे नैराश्य आले आहे.

हे वातावरण दूर करण्यासाठी नॉव्हेल संस्थेने हृदयस्पर्शी व्हिडीओ तयार केला आहे. या माध्यमातून आशावाद व्यक्त मनोधर्यै उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. शाळा व्यवस्थापनाने स्वत: चित्रीकरण केले असून इतरांसमोर हा आदर्श ठेवला आहे. आवर्जून सर्वांनी हा व्हिडीओ नक्की पहावा.

संभाजीनगर येथे असलेल्या नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेची प्रशस्त इमारत आहे. वर्गखोल्या मोठ्या आहेत. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोठे मैदान आहे. झाडांची लागवड केल्याने विद्यार्थ्यांना मोकळी हवा मिळते. शिक्षकवृंद चांगला आहे.

या शाळेत संस्काराचे मोती रुजविले जातात. शिक्षण पद्धती चांगली आहे. शाळेचा बारावीचा निकाल 100 टक्के लागतो. केजीपासून ते विविध अभ्यासक्रम येथे शिकविले जातात. विद्यार्थ्यांची क्षमता मोठी आहे.

संस्थाचालकांचे लहान-सहान गोष्टींवर बारीक लक्ष असते. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीवण्यावर त्यांचा भर असतो. नॉव्हेलमधील विद्यार्थी सर्वगूण संपन्न असावा यासाठी ते आग्रही असतात. नावीन्यपूर्ण शिक्षणासाठी, नॉव्हेलमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांला चांगली नोकरी मिळाली पाहिजे. त्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.