Pimpri: कच-यावर चर्चा करण्यासाठी विशेष महासभा घ्या; शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कच-याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी तातडीने विशेष महासभा घ्यावी. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी महासभा घेण्याची मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.

याबाबत महापौर राहुल जाधव यांना पत्र दिले आहे. त्यात कलाटे यांनी म्हटले आहे की, मागील दोन महिन्यात शहरातील कच-याची समस्या अतिशय बिकट झाली होती. जागोजागी कच-याचे ढीग साचले होते. कच-याच्या प्रश्नावर महासभेत सविस्तर चर्चा होणे अपेक्षित आहे. कच-याचा प्रश्न गहन असताना विविध कारणांनी महासभा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे कच-याच्या प्रश्नावर महासभेत चर्चा झाली नाही.

मागील सभेत कच-याच्या प्रश्नावर बोलत असताना सभागृह नेते एकनाथ पवार यांनी कच-याच्या प्रश्नावर स्वतंत्र महासभा घेण्यात येईल, असे सांगितले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापालिकेची विशेष महासभा घेण्यात यावी, अशी मागणी कलाटे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.