Pimpri : पथ विक्रेता कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ‘वर्षा’ बंगल्यासमोर फेरीवाले वडापाव व भाजीपाला विकणार

एमपीसी न्यूज –  महाराष्ट्र राज्यातील पथारी, हातगाडी, स्टॉल धारकावर ( Pimpri) विविध ठिकाणच्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये पथविक्रेत्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही आणि त्यांच्या वरती दंडकेशाही पद्धतीने कारवाई केली जात असल्याचा आरोप करत याचा निषेध करण्यासाठी  राज्यातील फेरीवाल्यांनी वडापाव, भाजीपालासह  इतर वस्तू मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानासमोर विकणार असा निर्धार केला आहे.

नॅशनल होकर फेडरेशन,महाराष्ट्र होकर फेडरेशन,महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे चिंचवड येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते काशिनाथ नखाते होते. यावेळी कार्याध्यक्ष राजू बिराजदार,कार्याध्यक्ष इरफान चौधरी,प्रदेश संघटक अनिल बारवकर, निमंत्रक किरण साडेकर, नाना कसबे, समाधान जावळे,बालाजी लोखंडे,अमोल घुगे,राजू पठाण, युवराज मिळवर्ण, सलीम शेख, शंकर भंडारी, अंबालाल सुकवाल,आसिफ शेख, सुरेश नवगिरे,के प्रसाद, अक्षय नवगिरे, योगेश लोंढे,मनोज यादव ,आदी उपस्थित होते.

Pune : 24 तासात पुण्याचे तापमान पुन्हा घसरले, पारा 10.9 अंशावर

फेरीवाला व्यवसाय संरक्षित करून त्यांचा व्यवसाय करण्यासाठी 2014  मध्ये पथ विक्रेता कायदा करण्यात आला. हा कायदा होऊन दहा वर्षे झाले तरीही अजून फेरीवाल्यावरती अन्याय सुरू आहे. स्मार्ट सिटी, अर्बन सीटच्या  नावाखाली करोडो रुपयाचा चुराडा करण्यात येत असून शहरांमध्ये योगदान असणाऱ्या गरीब श्रमिक पथ विक्रेत्यांना बाजूला करण्याचे बेकायदेशीर काम सुरू आहे.  कायदा अंमलात आणावा, फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांचा जागर यावेळी करण्यात येणार आहे.

नॅशनल हॉकर फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव शक्तिमान घोष, समन्वयक मेकॅजी डाबरे,अध्यक्ष जम्मू आनंद, कार्याध्यक्ष काशिनाथ नखाते,सचिव विनिता बाळेकुंद्री,अखिलेश गौड, सचिन गुळग,प्रेमनाथ वाघमारे आदी उपस्थित राहणार ( Pimpri) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.