Pimpri : संपूर्ण जागा ताब्यात नसताना निविदा, अधिका-यांची चौकशी करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – संपूर्ण जागा ताब्यात नसताना कोकणे चौक ते काळेवाडी फाटा या 1.6 किलो मीटर रस्त्याची पिंपरी-चिंचवड महापालिकेने बेकायदेशीर निविदा काढल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी घर बचाव संघर्ष समितीने केली आहे. तसेच याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावे अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी म्हटले आहे की, आर्थिक दिवाळखोरीत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेडून पैशांची उधळपट्टी सुरु आहे. मंजूर नसलेल्या एचसीएमटीआरच्या नावाखाली 28 कोटी रुपयांची निविदा काढली आहे. एचसीएमटीआर रस्ता भ्रष्टाचार प्रकरणी पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

महापालिका क्षेत्रात नसलेल्या व संपूर्ण जागा ताब्यात नसलेल्या कोकणे चौक ते काळेवाडी फाटा रस्त्याची बेकायदेशीर निविदा काढण्यात आली आहे. निविदा काढणा-या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी. दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.