Pimpri : आळंदी वारकरी शिक्षण संस्थेत आयोजित शिबिरात 104 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

एमपीसी न्यूज – शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा समन्वयक भूषण जगताप आणि ग्रामीण जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी येथे गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्थेत आज मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. वारकरी शिक्षणासाठी मठात वास्तव्य करून शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे 104 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून आळंदी येथे वारकरी शिक्षण घेण्यासाठी मुलं येत असतात, मठात वास्तव्य करून आपले शिक्षण घेत असताना, मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते किंवा बऱ्याच वेळेस त्रास होत असला तरी मुले सांगण्यास संकोच करतात. त्यामुळे आजार बळावतात. त्याचा परिणाम त्यांच्यासह इतर विद्यार्थ्यांवर होत असतो. या शिक्षण घेणाऱ्या मुलांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. या भावनेतून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा समन्वय भूषण जगताप व ग्रामीण रुग्णालयाच्या मदतीने हे मोफत आरोग्य शिबिर आज राबविण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांमध्ये खोकला व त्वचेविषयी समस्या असल्याचे दिसून आले. डॉ. कोलोड व डॉ. अश्विनी म्हात्रे यांनी १०४ विद्यार्थ्यांची तपासणी करून गरेजेप्रमाणे औषोधोपाचार दिला. या प्रसंगी डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी निरोगी आरोग्या विषयी मुलांना मार्गदर्शन केले.शिबिरास यावेळी अध्यापक ह.भ.प रामेश्वर महाराज ढकणे, ह.भ.प संदीप महाराज झांबरे व सरपंच अक्षय गुंड उपस्थित होते.

तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निरोगी आयुष्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी शिबिरास मार्गदर्शन केले. अध्यापक ह.भ.प. संदीप महाराज लोहर यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.